मुंबई के पालघर से पढ़िए महाराष्ट्र स्टेट हेड मोहम्मद अनीस सिद्दीकी की रिपोर्ट

पालघरची निवडणूक फक्त 9 -10 महीन्यासाठी असताना ही पोटनिवडणूक सर्वच पक्षांनी एवढी प्रतिष्ठेची का केली. जिल्ह्य़ातील सर्वात मोठा पक्ष असताना  बविआ चे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे आव्हान करून सुध्दा मोठ्या राजकीय पक्षांना ही निवडणूक येवढी महत्वाची का वाटते. भाजप आणि सेना वनगा साहेबांच्या मृत्यूचे भांडवल करून सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. 

पण मित्रांनो!! ही सहानुभूती वैगरे काही नसून पालघर जिल्ह्य़ातील होवू घातलेले वाढवण जेटी, बुलेट ट्रेन, बडोदा एक्सप्रेस हायवे, रेल्वे काॅरिडाॅर इ. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ही निवडणूक सेना- भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. 

सेना भाजपाच्या नेत्यांना पालघर जिल्ह्यातील रहिवाशांचे सोयरसुतक नाही. त्यातील एकही निर्णयक्षम नेता पालघरचा नाही त्यामुळे त्यांना त्याच्या राष्ट्रीय अजेंड्यावर असलेले प्रकल्प पूर्ण करावेच लागणार. 

पालघर जिल्हा हे बहुजन विकास आघाडीचे घर आहे बविआ हा पक्ष पालघरच्या मातीत जन्मलेला आहे बविआचे सर्वच नेते पालघर चे स्थानिक आहेत बविआ हा पक्ष  निर्णयासाठी मुंबई दिल्लीवर अवलंबून नाही. पालघर मधील भूमीपुत्रांवर अन्यायकारक प्रकल्पांना बविआ ने या आधीच जाहीर विरोध दर्शवला आहे. मित्रांनो पालघर हे आपले घर आहे आणि घराचे रक्षण आपल्यालाच करायचे आहे. आपण रक्षण करण्यास कमी पडलो तर ते घर भाड्याने द्यावे लागेल आणि हे भाडेकरू आपले घर आत्मियतेने सांभाळतील का? ह्याचा विचार करा.

त्यामुळे आपण सर्व एकत्र येऊन बविआ चे उमेदवार श्री. बळीराम सुकूर जाधव यांना विजयी करून ह्या सावत्र भावांना पालघर मधुन हद्दपार केले पाहीजे 

………जय हो!!!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *